Baba Vanga Prediction: सन 2023 मध्ये आण्विक आपत्ती, गूढवादी बाबा वांगा यांची भविष्यवाणी; घ्या जाणून
या वर्षात समूळ पृथ्वीलाच ध्वस्त करुन टाकेल अशी आण्विक आपत्ती येऊ शकते. तिच्या भविष्यवाणीसंदर्भात अनेक गोष्टी कथीतपणे सांगितल्या जातात.
Baba Vanga’s predictions for 2023 जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या 9/11च्या हल्ल्याबाबत आगोदर भविष्यवाणी करुन ठेवलेल्या बाबा वांगा या बल्गेरियन अंध महिलेने सन 2023 साठीचे भविष्यसुद्धा वर्तवले आहे. बाबा वांगा या गूढवाधी महिलेने केलेल्या भविष्यवाणीनुसार म्हणे सन 2023 हे वर्षसुद्धा सृष्टीसाठी अत्यंत धकाधकीचे राहणार आहे. या वर्षात समूळ पृथ्वीलाच ध्वस्त करुन टाकेल अशी आण्विक आपत्ती येऊ शकते. तिच्या भविष्यवाणीसंदर्भात अनेक गोष्टी कथीतपणे सांगितल्या जातात.
बाबा वांगा या अंध महिलेने जगाला वेड लावले आहे. साधारणपे मागच्या शतकाच्या उत्तरार्धात मृत्यू झालेल्या या महिलेने म्हणे अनेक भविष्यवाण्या करुन ठेवल्या आहेत. तिने केलेल्या भविष्यवाणीनुसार जगभरामध्ये अनेक गोष्टी घडल्याचा दावाही केला जातो आहे. आताही, तिचे अनुयायी असा दावा करतात की बाबा वंगा यांनी या वर्षी समोर येणार्या विनाशकारी आण्विक आपत्तीचा अंदाज लावला होता.
'द न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, बाबा वांगा हिने 2023 मध्ये एका मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्फोटाचा इशारा दिला होता. या स्फोटामुळे अशिया खंडावर विषारी ढग जमा होतील, असेही तिने म्हटले आहे. आकाशात विषारी ढगांची दाटी झाल्याने पृथ्वीवर रोगराई पसलेल असे तिने म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, Baba Vanga Predictions for New Year 2023: एलियनचा हल्ला, सोलर त्सुनामी ते लॅब बेबीचा उद्यय, बाबा वांगा यांनी वर्तवलीय सन 2023 ची भविष्यवाणी; घ्या जाणून)
2023 साठी बाबा वांगाची भविष्यवाणी
बाबा वांगा हिने आण्विक आपत्ती व्यतिरिक्त 2023 साठी इतरही चार प्रमुख भविष्यवाण्या केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
पृथ्वीची कक्षा
पृथ्वीची कक्षा बदलेन. सूर्याजवळ नाट्यमय घडामोडी घडतील. परिणामी हमनग वितळतील आणि गृहाला (पृथ्वी) महापूर येईल. रणामी हा गृह (पृथ्वी) हिमनगात डुंबेल.
सौर वादळ
सौर वादळ होऊ शकेल. ज्यामुळे सौर त्सुनामी येऊ शकेल. तंत्रज्ञानात मोठा बिघाड होऊन विनाशकारी घटना घडतील.
जैविक अस्त्राचा वापर
2023 मध्ये एका महासत्तेद्वारे जैविक अस्त्राचा वापर केला जाईल. ज्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल. जैविक शस्त्रे म्हणजे विषाणू, जीवाणू किंवा बुरशी यासारखे सूक्ष्मजीव किंवा सजीवांनी तयार केलेले विषारी पदार्थ. जे मनुष्य, प्राणी किंवा वनस्पतींमध्ये रोग आणि मृत्यूसाठी सोडले जातात.
नैसर्गिक गर्भधारणा
नैसर्गिक गर्भधारणा संपेल. सर्व बाळांना प्रयोगशाळांमध्ये वाढवले जाईल. जे राज्ये आणि वैद्यकीय तज्ञ ठरवतील. बालांच्या डोळ्याचा आणि केसांचा रंग यांसारखी वैशिष्टे्ये पालकांना निवडता येतील.
कोण आहे बाबा वांगा?
बाबा वांगा. त्याचे खरे नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. ती बल्गेरियन गूढवादी आणि दावेदार होती. तिचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी स्ट्रुमिका येथे झाला. जो त्यावेळी ऑट्टोमन साम्राज्याचा भाग होता. सध्या हा भाग उत्तर मॅसेडोनियामध्ये आहे. भविष्यातील घटनांचे भाकीत करण्याच्या तिच्या कथीत क्षमतेमुळे बाबा वांगा यांना "बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस" म्हणून संबोधले जाते. तिच्या संपूर्ण आयुष्यात, बाबा वांगा यांनी असा दावा केला की, त्यांनी अलौकिक दृष्टान्तांचा अनुभव घेतला. भविष्यातील घटनांचा अंदाज घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. ती बल्गेरियामध्ये सुप्रसिद्ध झाली. तिच्या कथित अचूक अंदाजांमुळे तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. तिच्या काही अनुयायांचा असा विश्वास आहे की तिने युनायटेड स्टेट्समधील 9/11 चे दहशतवादी हल्ले, चेरनोबिल आपत्ती, सोव्हिएत युनियनचे तुकडे होणे आणि ISIS चा उदय यासह अनेक मोठ्या घटनांचा अचूक अंदाज वर्तवला होता.
दरम्यान, बाबा वांगाच्या भविष्यवाण्यांची अचूकता अत्यंत विवादित आहे. तिच्या अनेक भविष्यवाण्या अस्पष्ट आहेत. ज्यावर अनेकदा वाद आणि प्रतिवादही झाले आहेत. बाबा वांगा यांचे 11 ऑगस्ट 1996 रोजी निधन झाले. तिच्या भविष्यवाण्यांवर तिचे अनुयायी मात्र विश्वास ठेवतात.