Baba Siddiqui Joins NCP: अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नुकतेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

Photo credit - ANI Twitter

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 8 फेब्रुवारी रोजी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सिद्दीकी यांचा पक्षात समावेश करण्यात आला. (हेही वाचा - Baba Siddique will join NCP: बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, तारिखही ठरली)

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. यामुळे पक्षाला मुंबईतील मुस्लिम समाजात आपले अस्तित्व मजबूत होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना म्हटले की, "आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करतो. त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क पक्षाला बळकट करेल."

पाहा व्हिडिओ -

 

सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा काँग्रेसला धक्का मानला जात आहे. नुकतेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा आगामी निवडणुकीत काय परिणाम होणार आणि मुंबईच्या राजकारणात काय बदल होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.