बी. जी. कोळसे पाटील यांचा वंचित बहुजन विकास आघाडीला धक्का, काढून घेतला पाठिंबा
कोळसे -पाटील यांनी पाठिंबा काढून घेतल्याने तडा गेला आहे.
वंचित बहुचन विकास आघाडी पक्षातील महत्त्वाची व्यक्ती आणि उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी.जी. कोळसे- पाटील (B G Kolse-Patil )यांनी पाठिंबा काढून घेतल्याने तडा गेला आहे. तसेच नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्या विरोधात घेतलेल्या या निर्णयामुळे वंचित आघाडीला धक्का देत असल्याचे कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे. याबद्दल त्यांनी फेसबुकवरुन पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारत आहे. त्यामुळे जातीवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजप पक्षावर रोख लावण्याची ताकद असलेल्या काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यात अपयश आले आहे. म्हणून मोदी आणि शहा यांच्या विरोधातील ठाम भुमिकेला आघाडीच्या भुमिकेमुळे तडा गेल्याचे कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
सर्व जाती धर्मांतील आणि विशेषत: माझ्या मराठा-कुणबी,SC,ST,Muslim बहिणी भावांनो मी आपल्या सर्वांच्या सर्व दु:खाचे मूळ शोधून त्यांवर मात करून सर्वांना सुखी करण्यासाठी पासून रात्रंदिवस काम करीत असल्याची भुमिका कोळसे-पाटील यांनी पोस्टमध्ये मांडली आहे. तसेच शेवटच्या श्वासांपर्यंत या ब्राम्ह्यण्यवादी व भांडवलशाहीला विरोध करणार असल्याचे ही कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे.