कोविड-19 वरील उपचारासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी औषधांसंबंधित खास मार्गदर्शक सूचना; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली माहिती
ही औषधे घेताना आवश्यक मार्गदर्शन सूचना टास्कफोर्स ऑन आयुष फॉर कोविड-19 यांच्याकडून जारी करण्यात आल्या आहेत.
देशासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा चिंता उत्पन्न करत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने निश्चित राज्य सरकारवरील जबाबदारी अधिक आहे. यापूर्वी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. तसंच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा चाचणीपूर्ण प्रयोग करण्यात येत होता. दरम्यान कोविड-19 (Covid-19) वरील उपचारपद्धतीत आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी औषधांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. ही औषधे घेताना आवश्यक मार्गदर्शन सूचना टास्कफोर्स ऑन आयुष फॉर कोविड-19 यांच्याकडून जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी ट्विटद्वारे सर्वसामान्यांपर्यंत शेअर केल्या आहेत. (महाराष्ट्रात कोरोनाविरूद्ध Remdesivir ची क्लिनिकल ट्रायल सुरू; वाढत्या रूग्णसंंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय)
यापूर्वी कोविड-19 च्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी केली होती. दरम्यान राज्यात या प्रभावशाली औषधाच्या क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्या असून राज्यातील 14 सरकारी वैद्यकीय कॉलेज आणि 4 मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांना हे औषध देण्यात येत आहे.
Rajesh Tope Tweet:
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 101141 वर पोहचला असून एकूण 3717 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 49616 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 47796 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी आता पुन्हा लॉकडाऊन लागू होणार नाही असे स्पष्टीकरण मुख्यंमत्री कार्यालयातून देण्यात आले आहे. मात्र शासनांच्या सूचनांचे पालन करणे, गर्दी न करणे आणि काळजी घेण्याचे आवाहनही सातत्याने सरकारकडून करण्यात येत आहे.