Woman Filed Complaint Against Road In Aurangabad: महिलेला छळतो रस्ता, औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल; मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप

रस्त्यावरुन प्रवास करताना संध्या घोळवे-मुंडे यांना नाहक मनस्ताप आणि इतर त्रासांना सामोरे जावे लागते. परिणामी रस्त्याची सुधारणा होत नाही म्हणून त्यांनी चक्क पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत थेट तक्रार दिली.

Woman Filed Complaint Against Road |

ऐकावे ते नवलच. औरंगाबाद (Aurangabad) येथे म्हणे एक रस्ता चक्क महिलेला छळतो. हा रस्ता तिला केवळ छळतच नाही तर, महिलेला मानसिक (Mental Harassment), शारीरिक (Physical Harassment) आणि आर्थिक त्रास (Financial Harassment) व्हावा म्हणून तो चक्क तिची अडवणूकही करतो. वाचून नवल वाटले ना? पण संबंधित महिलेचाच हा आरोप आहे. धक्कादायक असे की हा आरोप करत या महिलेने चक्क औरंगाबाद (Aurangabad Police) येथे पोलीस तक्रार केली आहे. संध्या घोळवे-मुंडे (Sandhya Gholave-Munde) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. या विचित्र तक्रारीनंतर पोलिसही चक्रावले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, संध्या घोळवे-मुंडे या पेशाने नोकरदार आहेत. त्या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यकरत आहेत. दैनंदिन कामासाठी त्यांना घरातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने ये-जा करावी लागते. या रस्त्याची प्रचंड दुरावस्ता झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरुन प्रवास करताना संध्या घोळवे-मुंडे यांना नाहक मनस्ताप आणि इतर त्रासांना सामोरे जावे लागते. परिणामी रस्त्याची सुधारणा होत नाही म्हणून त्यांनी चक्क पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत थेट तक्रार दिली. (हेही वाचा, No Shower, Only Sex! लॉकडाउन काळात पती आंघोळही न करता सतत सेक्स करतो म्हणून महिलेने मागितली पोलिसांकडे मदत)

संध्या घोळवे-मुंडे यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा रस्ता आपल्याला जाणीवपूर्वक मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देतो. आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने धक्काबुक्की आणि अडवणूक करतो. गेल्या काही दिवसांमध्ये हा रस्ता सुधारेल अशी आपल्याला आशा होती. परंतू दिवसेंदिवस हा सस्ता अधिकच प्राणघातक ठरत चालला आहे. या रस्त्याला वेळीच आवर घातली नाही तर तो आपल्यावर कधीही हल्ला करु शकतो अशी भीतीही संध्या घोळवे-मुंडे यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now