Aurangabad Shocker: औरंगाबाद मध्ये धनलाभ आणि मुलाचं भलं व्हावं या हव्यासातून पोटच्या मुलीला जाळण्याचा जन्मदात्या आईचा प्रयत्न; पोलिसात गुन्हा दाखल

मुलीला जिवंत जाळून मारले तर तुला चांगला धनलाभ होईल आणि तुझ्या मुलाचेसुद्धा चांगले होईल" असं सुप्रियाच्या आईच्या मैत्रिणीने तिला सांगितलं आणि पैशाच्या हव्यासातून पार्वतीने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये हृद्य पिळवटणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. आईने चक्क पैशाच्या लोभासाठी आणि लेकाचं भलं व्हावं यासाठी मैत्रिणीचं ऐकून आपल्या 20 वर्षाच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जाळूनही मृत्यू न झाल्याने या मुलीला 5 दिवस घरातच डांबून ठेवले होते. या प्रकरणी आई विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, 20 वर्षीय सुप्रिया दादासाहेब हलमुखला जाळण्याचा प्रयत्न तिच्याच 40 वर्षीय पार्वती हलमुख या आईने केला. सुप्रियाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ती आपल्या आई, भावासोबत राहत होती.

मागील आठवड्यात 17 ऑगस्ट दिवशी सुप्रिया खाजगी कामावरून परतल्यानंतर तिच्या आईने अंगावर रॉकेल ओतत तिला जाळण्याचा प्रयत्न केला. सुप्रियाने आरडाओरड केल्यानंतर तिचा भाऊ धावून आला आणि त्याने आग विझवली. यामध्ये सुप्रिया गंभीर जखमीदेखील झाली आहे. त्यानंतर आईने सुप्रियाला डांबून ठेवले. नक्की वाचा: Crime: क्रुरता ! मांत्रिकाने सांगितले मुलाचा जीव वाचवायचा असेल तर नरबळी द्यावा लागले, अंधश्रद्धेतून पोटच्या मुलीचा आईने घेतला जीव .

एक दिवस आई नसलेली वेळ साधत सुप्रियाने पोलिस स्टेशन गाठलं. याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्या महिलेवर आणि आरोपी आईवर गुन्हा दाखल केला आहे. "मुलीला जिवंत जाळून मारले तर तुला चांगला धनलाभ होईल आणि तुझ्या मुलाचेसुद्धा चांगले होईल" असं सुप्रियाच्या आईच्या मैत्रिणीने तिला सांगितलं आणि पैशाच्या हव्यासातून पार्वतीने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं.  सध्या पोलिसांनी पार्वती आणि तिची मैत्रिण दोघींवरही गुन्हा दाखल केला आहे.