Bidkin: लाडू तुला, पेढे मला.. पळा पळा, एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम स्थळी  पळवापळवी; 21 सेकंदात खुर्दा, बिडकीन येथील घटना

तर संदिपान भुमरे यांच्या समर्थकांनी त्यांची तुला करण्यासाठी 110 किलो पेढे आणले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ही तुला करण्यास नकार दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या तुलेकडे पाठ फिरवताच उपस्थित गर्दीने या लाडू आणि पेढ्यांची पळवापळवी सुरु केली.

Peda, Laddu | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि सभा दणक्यात व्हावी यासाठी एकनाथ शिंदे गटान जोरदार तयारी केली होती. एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा दौरा आहे. पैठण (Paithan) येथील कावसानकर स्टेडियमवर एकनथ शिंदे (CM Eknath Shinde In Aurangabad) यांची सभा आयोजित करण्यात आली. दरम्यान, बिडकीन येथे शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान काहीसा विचित्र प्रकार पाहायला मिळाला. संदिपान भुमरे आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांची तुला करण्यासाठी सुमारे 100 किलो पेढे आणले होते. तर संदिपान भुमरे यांच्या समर्थकांनी त्यांची तुला करण्यासाठी 110 किलो पेढे आणले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ही तुला करण्यास नकार दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या तुलेकडे पाठ फिरवताच उपस्थित गर्दीने या लाडू आणि पेढ्यांची पळवापळवी सुरु केली.

बिडकीन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला जमलेल्या गर्दीने तब्बल 100 किलो पेढे आणि 110 किलो लाडवांचा अवघ्या 21 मिनीटांत खुर्दा केला. सर्व लाढू आणि पेढे पळविण्यात आले. नागरिक लाढू, पेढे पळवत असतानाची दृश्ये प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यात टीपली. एबीपी माझा या वृत्ताहिनीने याबाबत दृश्यांसह वृत्त दिले आहे. दरम्यान, घटनास्थळी पेढे तुला.. लाढू मला अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत होती. (हेही वाचा, Ajit Pawar on CM Eknath Shinde: सत्ताधारी पक्षाचेच आमदार गोळीबार करतात हे दुर्दैवी; अजित पवार यांचे राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हयरल झाली आहे. या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी भाड्याने माणसे आणण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे ऐकायला मिळते. लेटेस्टली मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र प्रसारमाध्यमानी दिलेल्या वृत्तात आणि सोशल मीडियात या क्लिपची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या क्लिपवरुन जोरदार टीका केली आहे. सभा यशस्वी व्हावी यासाठी भाड्याने माणसे आणावी लागतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, विरोधकांचे आरोप आणि ऑडिओ क्लिप याबाबत केले जाणारे सर्व दावे मंत्री संदिपान भूमरे यांनी फेटाळून लावले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे विरोधकांचीच खेळी आहे. विरोधकच हे सर्व प्रकार करत आहेत. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्यात यावी. खरा प्रकार काय आहे हे लोकांसमोर अशी मागणी आम्ही पोलिसांकडे करणार असल्याचेही संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे.