Aurangabad Murder Case: औरंगाबाद मध्ये बहीण-भावाच्या हत्येने खळबळ; घरातील सोनं, रोख रक्कम लंपास

त्यांची हत्या करून घरातील ऐवज लुटण्यात आला आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

औरंगाबाद (Aurangabad) मध्ये बहिण-भावाच्या हत्याकांडाचा एक खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. काल (9 जून) च्या रात्री हल्लेखोरांनी घरामधून दीड किलो सोनं आणि 6500 रूपये रोख चोरल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरण खंदाडे (Kiran Khandade) आणि सौरभ खंदाडे (Saurabh Khandade)  अशी मृतांची नाव असून ते बहिण आणि भाऊ आहेत. Murder In Pune: पिंपरी-चिंचवड येथे प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून; एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक

औरंगाबाद शहरामध्ये सातारा परिसरातील MIT समोरील एका बंगल्यात लालचंद खंदाडे हे कुटुंब भाड्याने राहत होते. दरम्यान काही खाजगी कारणास्तव लालचंद खांदाडे त्यांच्या पत्नी व एका मुलीसोबत दुसर्‍या गावात गेले होते. तर घरात त्यांची 2 मुलं होती. रात्री उशिरा खंदाडे कुटुंब परतल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला.

दरम्यान खंदाडे कुटुंबातील भावा-बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. या हत्येचा पोलिस तपास सुरू असून ओळखीच्याच कोणत्यातरी व्यक्तीकडून हा प्रकार केला जाऊ शकतो असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये काही प्रमाणात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif