Aurangabad Municipal Corporation Election: औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 'बिहार पॅटर्न'? निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
निवडणूक आयोगाने मात्र अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे सर्वांचे डोळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लागले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणासाठी निवडणूक आयोगाने देश आणि राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलल्या, काही ठिकाणी निवडणूक कार्यक्रम स्थगित केला. सहाजिच हे आदेश 'औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020' ( Aurangabad Municipal Corporation Election 2020) बाबतही लागू राहिले. त्यामुळे एप्रिल 2020 मध्ये होणारी औरंगाबाद महापालिका निवडणूक ( Aurangabad Municipal Corporation Election) कोरोना व्हायरस (COVID 19 संसर्ग टाळण्यासाठी अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) अल्पावधीतच पार पडत आहे. बिहार विधानसभा निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्याच प्रमाणे औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporatio) निवडणुकीतही 'बिहार पॅटर्न' (Bihar Pattern) राबवत निवडणूक घेतली जाऊ शकते अशी चर्चा आहे. निवडणूक आयोगाने मात्र अद्याप याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे सर्वांचे डोळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लागले आहेत.
दरम्यान, सूत्रांच्या हावाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद महापालिका निवडणूक बिहार पॅटर्न प्रमाणे घेण्यासाठी लवकरच आदेश काढण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या बिहार पॅटर्नला हिरवा कंदील दाखवल्यास ही निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात पार पडू शकते. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: स्वबळावर नव्हे! मित्र पक्षांसोबत भाजप लढणार बिहार विधानसभा निवडणूक, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी सोबत आघाडी)
काय आहे बिहार पॅटर्न
देशभरात कोरोना व्हायरस संसर्गाचा कहर आहे. त्यामुळे देशभरातील निवडणूक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. असे असले तरी काही नियम, अटी, शर्थी घालून बिहार विधानसभा निवडणूक 2020 घेण्यास निवडणूक आयोगाने संमती दर्शवली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमं आणि अचारसंहिता पालन करत बिहारमध्ये निवडणूक पार पडणार आहे. मतदान, अर्ज भरणा, प्रचार आदींबद्दलही निकष व नियम निवडणूक आयोगाने नुकतेच जाहीर केले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला लागू
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश हे बिहार निवडणुकीसाठी आहेत. असे असले तरी नियम आणि संकेतानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश देशातील सर्वच राज्य निवडणूक आयोगाला लागू होतात. त्यामुळे बिहारसाठीचे नियम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगासही ते लागू होतील. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवले तर औरंगाबाद महापालिका निवडणूक नजीकच्या काळात निवडणुकीच्या बिहार पॅटर्न नुसार पार पडू शकतात.
निवडणूक सज्जता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड रचना, वॉर्डांचे आरक्षण, मतदार यादी आदी गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आता केवळ निवडणुकीचा तारीख जाहीर होणे बाकी आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यास निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक इतर सर्व तयारी पूर्ण झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, औरंगाबाद महापालिका कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे एप्रील 2020 मध्ये ही निवडणूक पार पडणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला. त्यामुळे पालिकेवर सध्या प्राशासक नियुक्त करण्यात आला आहे. प्रशासकाचा कार्यकाळ सहा महिने असतो. हा कार्यकाळ सप्टेंबर अखेरीस संपतो आहे. त्यामुळे लवकरच पालिका निवडणूक पार पडू शकते.