औरंगाबाद: तुझ्यामुळेच परिक्षेत नापास झाल्याने संपूर्ण वर्षाची फी दे, प्रियकराकडून प्रेयसीवर आरोप

औरंगाबाद (Aurangabad) येथील एका विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीवर नापास तिच्यामुळे झाल्याचा आरोप लगावला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Unsplash.com)

औरंगाबाद (Aurangabad) येथील एका विद्यार्थ्याने आपल्या प्रेयसीवर नापास तिच्यामुळे झाल्याचा आरोप लगावला आहे. तसेच नापास झाल्याने तिच्याकडून संपूर्ण फी देण्याची मागणी प्रियकराकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे.

गेल्या वर्षी या विद्यार्थ्याने वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश केला होता. तर या विद्यार्थ्याची प्रेयसीसुद्धा त्याच्यासोबत शिकत होती. दोघे नेहमी एकत्र अभ्यास करायचे तरीही पहिल्या वर्षाला प्रियकर नापास झाला. त्यामुळे त्याला पुढील वर्षाच्या अभ्यासाठी प्रवेश घेता आला नाही. यामुळे त्याने प्रेयसीवर तुझ्यामुळे मी नापास झालो असा आरोप लगावला. त्याचसोबत संपूर्ण वर्षभराची माझी फी मला हवी असल्याची मागणी करु लागला.(मुंबई: मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, आजारी असूनही निवडणूकीचे काम जबरदस्तीने करायला लावल्याचा कुटुंबियांचा आरोप)

तर प्रेयसीला वारंवार फोन करुन प्रियकर त्रास देत होता. तसेच सोशल मीडियावर उलटसुलट तिच्याबद्दल पोस्ट करण्यास त्याने सुरुवात केली होती. त्यामुळे प्रेयसीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif