औरंगाबाद: देवदर्शन करून येत असताना क्रूझर कारच्या भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू

या अपघातात देवदर्शन करून येत असलेल्या 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास क्रुझर कारने इगतपुरी येथून देवदर्शन करून बुलढाण्याला जात असताना हा अपघात झाला.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

औरंगाबाद- जालना रस्त्यावर (Aurangabad-Jalna Road) शुक्रवारी पहाटे क्रूझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात देवदर्शन करून येत असलेल्या 4 भाविकांचा जागीच मृत्यू  (4 People Death) झाला असून 9 जण जखमी (9 People Injured) झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास क्रुझर कारने इगतपुरी येथून देवदर्शन करून बुलढाण्याला जात असताना हा अपघात झाला.

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिल्याने क्रुझर कारमधील भाविकांवर काळाने घाला घातला. काशिनाथ देवराव मेहत्रे, रवी बबन जाधव, संगीता गणेश बुंदे, ऋषीधर देवराव तिडके, अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. (हेही वाचा - महासंहारक जैविक अस्त्रे बनवण्याच्या प्रयत्नातून कोरोना वायरस सारख्या विषाणूंची निर्मिती? शिवसेनेचा सवाल)

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या 9 जणांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व जण देवाचं दर्शन घेऊन बुलडाण्याच्या दिशेने जात होते. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं.