औरंगाबाद येथील भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक
भागवत कराड यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर कराड यांच्या कारची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद येथील भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर कराड यांच्या कारची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संध्याकाळच्या वेळेस कार्यकर्त्यांशी कराड बातचीत करत होचे. त्यावेळी दुचाकीवरुन काही आलेल्या काही अज्ञातांकडून त्यांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये कराड यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नुतन कॉलनीत कराड यांचे घर आहे. संध्याकाळच्या वेळेस कराड पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. त्यावेळी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. तातडीने पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या प्रकारामुळे कराड यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली.
लवकरच औरंगाबाद येथे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच भाजप मधील नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याच कारणामुळे कराड यांच्या घरावर हल्ला करण्यामागे काही हात आहे का याचा तपास केला जात आहे.('मुसलमानांचं इतकंच वावडं आहे तर मग सत्तार तुमच्या आईचा....!'; शिवसेना नेतृत्वावर टीका करताना हर्षवर्धन जाधव यांची जीभ कमालीची घसरली)
काही महिन्यांपूर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. जाधव यांच्या या प्रकारानंतर त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर खालच्या पातळीला जाऊन जाधव यांनी टीका केली होती.