Aurangabad Accident: पत्नीने घराबाहेर हाकललेल्या दारुड्या नवऱ्याचा बसखाली चिरडून मृत्यू

रवी किशोर मगरे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो कामगार होता. कामावरुन येतोना तो दारु पिऊन आला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने (Wife) त्याला घरात घेण्यास नकार दिला.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

औरंगाबाद (Aurangabad Accident) येथील मुंकुंदवाडी (Mukundwadi) येथे एका व्यक्तीचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. रवी किशोर मगरे असे या व्यक्तीचे नाव आहे. तो कामगार होता. कामावरुन येतोना तो दारु पिऊन आला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने (Wife) त्याला घरात घेण्यास नकार दिला. त्यानंतर तो रस्त्याकडेला असलेल्या एका खासगी बसखाली झोपी गेला. दरम्यान, सकाळी बसचालकाने येऊन बस सुरु केली. या वेळी बसखाली झोपलेल्या नागरिकाचा चिरडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी चौकशी करुन चालकाला ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद येथील मुकुंदवाडी येथील झेंडा चौकात उभ्या असलेल्या बसखाली रवी किशोर मगरे झोपला होता. पाटील ट्रान्सपोर्टची ही बस कंपनीतील कामगारांना आणण्यासाठी वापरण्यात येते. कामगारांची शिफ्ट संपल्याने त्यांना आणण्यासाठी बसचालक गणेश राठोड हा नेहमीप्रमाणे आला आणि बस सुरु करुन निघून गेला. मात्र, बसखाली झोपलेला रवि हा वाहनाच्या मागच्या टायरखाली आला आणि चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसातून येजा करणाऱ्या नागरिकांना रिवाचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा, Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी)

प्राप्त माहितीनुसार, दारु पिऊ नको असे वारंवार सांगूनही नवरा दारु सोडत नव्हता. त्याला दारुचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे पत्नी त्रस्त होती. दारुमुळे अनेकदा वाद होऊन पत्नी माहेरी जात असे. घटना घडली त्या दिवशीही तो दारु पिऊनच घरी आला होता. त्यामुळे पत्नीने त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे त्याने आपण पुण्याला जात असल्याचे सांगितले आणि तो तिथून निघाला. मात्र, पुढे पुण्याला न जाता तो थेट बसखाली येऊन झोपला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.