औरंगाबद: वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये 27 कोटी रुपयांच्या सोन्यावर डल्ला, आरोपींना अटक

औरंगाबाद (Auranagabad) येथील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये 58 किलो सोने चोरीला गेल्याता प्रकार घडला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

औरंगाबाद (Auranagabad) येथील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये 58 किलो सोने चोरीला गेल्याता प्रकार घडला आहे. या प्रकरणी चोरट्यांनी 27 कोटी रुपयांचे सोने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर पोलिसांकडून शाखेच्या व्यवस्थापकासह अन्य तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

वामन हरी पेठे ज्वेलर्सचे शाखा व्यवस्थापक अंकुर राणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चोरी ही वर्षापूर्वी केली असून त्याचा खुलासा आता झाला आहे. दुकान मालकांना व्यवस्थापकावर आधिपासून संशय होता.(हेही वाचा-मुंबई: चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला विमानतळावरुन अटक)

मात्र व्यवस्थापक मालक याबद्दल त्याला सातत्याने विचारत असे तेव्हा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी कानाडोळा करत होता. मात्र त्याच्यावर अखेर मालकाने गुन्हा दाखल केल्यानंतर व्यवस्थापकाने सर्व प्रकार सांगितला आहे.