औरंगाबाद मध्ये संपत्तीच्या वादातून भावाची हत्या करणाऱ्या 57 वर्षीय दोषीला अटक
औरंगाबाद (Aurangabad) मध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीने खांदानी संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या 54 वर्षीय भावाची हत्या (Murder) केली आहे.
नात्यापेक्षा पैसे, संपत्ती अधिक महत्वाचे झाल्याने आजवर अनेक प्रसंगात रक्ताच्या नातेवाईकांनी केसाने गळा कापल्याचे समोर आले आहे. आता असाच एक नवा प्रकार महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यात सुद्धा घडल्याचे समजत आहे. औरंगाबाद (Aurangabad) मध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीने खांदानी संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या 54 वर्षीय भावाची हत्या (Murder) केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत भावाचे नाव सूर्यप्रकाश ठाकूर (Suryaprakash Thakur) असे असून, त्याच्या हत्येच्या आरोपाखाली थोरला भाऊ वेदप्रकाश रामनाथ ठाकूर (Vedprakash Thakur) याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात जवाहरनगर पोलीसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या संपत्तीच्या वादातूनच झाली असल्याचे समोर येतेय. Aurangabad Double Murder Case: औरंगाबाद येथील बहीण-भावाच्या हत्येचे गूढ उकलले; चुलतभावानेच दाजीसह केला घात
पोलिसांना प्राप्त माहितीनुसार, वेदप्रकाश ठाकूर हे गारखेडा या भागात राहणाऱ्या भावाच्या घरी आले होते. त्यांनी सूर्यप्रकाश यांच्याकडे कुटुंबातील प्लॉट मध्ये हिस्सा आणि घर घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. यावेळी सूर्यप्रकाश यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. सूर्यप्रकाश यांनी पैसे देण्यासाठी नकार दिल्याने वेदप्रकाश यांनी सोबत आणलेल्या चाकूने थेट आपल्या भावावर हल्ला केला. यामध्ये सूर्यप्रकाश यांचा मृत्यू झाला. सूर्यप्रकाश हे वकील होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती तुलनेने चांगली होती याच कारणाने वेदप्रकाश यांना मत्सर जाणवत होता.हे देखील वाचा- Murder In Pune: पिंपरी-चिंचवड येथे प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून; एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक
दरम्यान, सूर्यप्रकाश यांच्यावर हल्ला करून वेदप्रकाश त्या ठिकाणहून पळ काढत फरार झाला होता. मात्र पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणातील दोषींचा शोध घेतला. खून झाल्या दिवशीच पोलिसांनी वेदप्रकाश याला अटक करून त्याच्यवर गुन्हा दाखल केला आहे.