Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावरून अतुल भातखळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

एका नराधमाने 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोंखडी रॉड घातल्याचा धक्काप्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील पीडिताचा आज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

Atul Bhatkhalkar (Photo Credits: Twitter)

मुंबईतील साकीनाका परिसरात शुक्रवारी 'निर्भया' प्रकरणाची आठवण देणारी क्रूर घटना घडली आहे. एका नराधमाने 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोंखडी रॉड घातल्याचा धक्काप्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील पीडिताचा आज घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. तर, या घटनेवरून भाजपकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप नेते आणि अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया देत राज्य सरकारला वेठीस धरले आहे. याचदरम्यान, अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. इकड तिकडच्या फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. अतुल भातखळकर यांच्या टिकेवर राष्ट्रवादीकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- Sakinaka Rape Case: महिला सुरक्षेबाबत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले महत्वाचे सल्ले

अतुल भातखळकर यांचे ट्वीट-

याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान, “एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल कराव. जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी.”, असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif