Pune: पुणेकर लक्ष द्या, घरात मांजर पाळायची असेल तर महापालिकेचा घ्यावा लागेल परवाना

यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे.

Photo Credit - pixabay

पुणेकरांना (Pune) आता कुत्र्यापाठोपाठ घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, पुढील आठ दिवसात मांजराचा परवाना घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे. याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. (हे देखील वाचा: Pune: पुणे पोलिसांकडून मेस्कलिन आणि मेफेड्रोनच्या अनेक गोळ्या जप्त, तिघांना अटक)

महापालिकेच्या नियमानुसार कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्‍यक आहे. पण शहरात केवळ कुत्रे व घोडे यांचे परवाना घेतले जातात पण त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात कमी आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार शहरात 1 लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत, पण आत्तापर्यंत केवळ 5 हजार 500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झालेली आहे. मांजर पाळण्याचे प्रमाणही वाढत असले तरी परवाना घेण्याबाबत नागरिकांची मानसिकता नाही.



संबंधित बातम्या