Loksabha Election 2024: कोंढा गावात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न, पाहा संतापलेल्या गावकऱ्यांचा Video
'एक मराठा लाख मराठा' अश्या घोषणा देत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील मराठा आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या गाड्याच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला आहे.
Loksabha Election 2024: 'एक मराठा लाख मराठा' अश्या घोषणा देत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील मराठा आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या गाड्याच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला आहे. कोंढा येथील गावकऱ्यांनी अशोकराव चव्हाण यांना गावातून बाहेर जाण्यास सांगितले आहे. गावकऱ्यांचा रोष पाहून अशोकराव चव्हाणांनी माघारा घेतली आहे.(हेही वाचा- साताऱ्यात चुरशीची लढत! उदयनराजेंविरोधात शरद पवार थेट पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची शक्यता
महायुतीचे उमेदवार खासदार प्रतावराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेड येथील कोंडा गावात आले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एक मराठा लाख मराठा सह विविध घोषणा देत गावकऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.त्यावेळी पोलिसही उपस्थित होते. पोलिसांनी गावकऱ्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला.
परंतु गावकरी आक्रमक झाले आणि गाड्याच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांची आक्रमकता पाहून अशोक चव्हाण यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. या पुर्वी ही अनेक गावात मराठा आरक्षणामुळे नेत्यांना गावात येणास बंदी होती. नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या कालावधीत विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता असून प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे असे चित्र दिसत आहे.