Pune: Rohit Pawar यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात व्यक्तीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेसंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तीन अत्रात व्यक्ती कार्यालयात जाताना दिसत आहे. मात्र, अद्याप ही जाळपोळ कोणी केली यासंदर्भात खुलासा झालेला नाही. रोहित पवार यांच्याकडून याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

Pune: पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय (Office) जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार यांचे हडपसर परिसरात सृजन हाऊस येथे जनसंपर्क कार्यालय आहे. अज्ञात व्यक्तीने रोहित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी आग लावली.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेसंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तीन अत्रात व्यक्ती कार्यालयात जाताना दिसत आहे. मात्र, अद्याप ही जाळपोळ कोणी केली यासंदर्भात खुलासा झालेला नाही. रोहित पवार यांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाच्या काही भागामध्ये ही जाळपोळ करण्यात आली. (हेही वाचा - Pawar Vs Pawar: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणून आज अजित पवार गट पोहचला शरद पवारांच्या भेटीला ! (Watch Video))

दरम्यान, अद्याप रोहित पवार यांच्याकडून याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तथापी, शनिवारी अहमदनगरमध्ये एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. धारदार शस्त्राने वार केल्याने अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तथापी, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मश्रीफ हेही अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले आहेत. शरद पवारांनी आमचे म्हणणे ऐकले असून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.