नागपूर मध्ये ATM देत होतं टाकलेल्या रक्कमेच्या पाच पट पैसे; अनेकांची नशीब आजमण्यासाठि तोबा गर्दी
खापरखेडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ₹ 500 मूल्याच्या चलनी नोटा चुकून एटीएम ट्रेमध्ये ₹ 100 मूल्याच्या नोटा वितरीत करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
नागपूर (Nagpur) मध्ये एका एटीएम (ATM) मधून पाच पट पैसे आल्याची बाब समोर आली आहे. रिफिल करताना झालेल्या एका चूकीमुळे हा प्रकार होत आहे असे पीटीआय रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे. एका व्यक्तीने 500 रूपये काढले. पण प्रत्यक्षात त्याला 500 रूपयांच्या 5 नोटा मिळाल्या. एकदा हा प्रकार झाल्यानंतर त्याने पुन्हा 500 रूपयांची रक्कम एंटर केली पण पुन्हा त्याला 2500 रुपये मिळाले.
खापरखेडा गावातील खाजगी बॅंकेच्या एटीएम मध्ये हा प्रकार झाला आहे. नागपूर शहरापासून हे गाव 30 किमी लांब आहे. जेव्हा या एटीएम मधून 5 पट रक्कम येत असल्याची बातमी गावात वणव्यासाठी पसरली तेव्हा अनेकांनी आपलं नशीब आजमण्यासाठी एटीएम मध्ये गर्दी केली होती.
एका बॅंक ग्राहकाने पोलिसांकडे या प्रकाराबाबत कळवलं तेव्हा गर्दी पांगवण्यासाठी पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी एटीएम बंद केले. पोलिसांनी बॅंकेला देखील हा प्रकार कळवला आणि गर्दी कमी केली. हे देखील नक्की वाचा: ATM म्हणजे काय? Automated Teller Machine चा वापर करून सुरक्षित आर्थिक व्यवहार करताना या गोष्टींबाबत अलर्ट रहाच!
हा प्रकार टेक्निकल ग्लिच नसून रिफिल करताना प्रत्यक्षात मनुष्याकडून झालेल्या चूकीमधून हा प्रकार घडला आहे. खापरखेडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ₹ 500 मूल्याच्या चलनी नोटा चुकून एटीएम ट्रेमध्ये ₹ 100 मूल्याच्या नोटा वितरीत करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. अद्याप या प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.