बारामती येथे अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करत ठार करण्याचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा दाखल
ही घटना बारामती (Baramati) शहरात शुक्रवारी सायंकाळी घङली. संबंधित मुलाला ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी (Police) आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर (Minor Boy) धारदार शास्त्राने वार करून विहिरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आले. ही घटना बारामती (Baramati) शहरात शुक्रवारी सायंकाळी घङली. संबंधित मुलाला ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी (Police) आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. देशावर कोरोनाचे संकट वावरत असताना या घटनेने अनेकांचे लक्ष्य केंद्रीत करून घेतले आहे. आरोपी आणि पीडित एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
आयुब गुलाब कुरेशी असे आरोपीचे नाव आहे. आयुब हा पीडिताच्या घराशेजारी वास्तव्यास आहे. आरोपीने अज्ञात कारणांवरून फिर्यादी कैफ कुरेशी यास बाहेर जाऊन येऊ असे सांगत त्यास त्याच्या बरोबर घेऊन गेला. त्यानंतर गुलाबने कुरेशीला जवळच्या एका विहिरीजवळ नेले आणि त्याच्यावर धारदार शास्त्राने वार करत त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गुलाबने कुरेशीच्या गळ्यावर, मानेवर धारदार शास्त्राने वार केले. एवढ्यावर न थांबता आयुबने त्याला विहिरीत फेकून दिले. सुदैवाने कैफचा जीव वाचला असून त्याने नोंदवलेल्या तक्रारीनुसार स्थानिक पोलिसांनी आयुबला ताब्यात घेतले. तसेच हत्येचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूत करण्यात आले आहे. हत्येच्या प्रयत्न मागचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलीस याची अधिक चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- COVID-19: अकोला येथे 30 वर्षीय करोनाबाधित रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या
सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुन्हेगारीच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर येत आहेत. परंतु, बारामती येथे घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीकडून चक्क 16 वर्षीय मुलावर झालेल्या प्रयत्न केल्याने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत.