Asia's First Breast Milk Bank at Sion Hospital: मुंबई येथील सायन रुग्णालात 'ब्रेस्ट मिल्क' बँकेद्वारे 10,000 नवजात बालकांना दूध पुरवठा

या बँकेने पाठिमागील पाच वर्षांत 10,000 हून अधिक नवजात बालकांना (Newborn Care) मदत करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Human Milk | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईतील सायन (Sion Hospital) येथील नागरी संचालित LTMG हॉस्पिटलमध्ये 1989 मध्ये ब्रेस्ट मिल्क बँक (Breast Milk Bank) स्थापन करण्यात आली. या बँकेने पाठिमागील पाच वर्षांत 10,000 हून अधिक नवजात बालकांना (Newborn Care) मदत करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ऑगस्ट 2024 मध्ये राष्ट्रीय स्तनपान महिना (National Breastfeeding Month) साजरा केला. या वेळी सादर करण्यात आलेल्या आकडेवारीत इनेक महत्त्वपूर्ण नोंदी पुढे आल्या. यामध्ये दूध बँकेला देणगी देणाऱ्या 43,412 नवीन मातांच्या उदारतेमुळे हे यश शक्य झाल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मानवी दूध बँक नवजात बालकांना फायद्याची

सायन हॉस्पिटलमधील मानवी दूध बँक अनेक नवजात बालकांना, विशेषत: अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना आवश्यक पोषण पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम भारतातील इतर रुग्णालयांसाठीही अशाच प्रकारच्या मिल्क बँका स्थापन करण्यासाठी हे मॉडेल म्हणून काम केले आहे. (हेही वाचा, FSSAI Warns Over Human Milk: 'नॉट फॉर सेल', मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या विक्रीबाबत 'एफएसएसएआय'चा इशारा, भारतात विक्रीस परवानगी नाही)

सायन रुग्णालयात दरवर्षी सरासरी 10,000 ते 12,000 बालकांचा जन्म

सायन हॉस्पिटलचे डीन डॉ मोहन जोशी म्हणाले, "अपुरी वाढ आणि कमी वजन असलेल्या अर्भकांना या हॉस्पिटलच्या नवजात अतिदक्षता विभागाद्वारे व्यवस्थापित मानवी दूध बँकेतून दूध दिले जाते." या रुग्णालयात दरवर्षी सरासरी 10,000 ते 12,000 बालके जन्माला येतात आणि यातील 1,500 ते 2,000 नवजात बालकांना मिल्क बँकेच्या आधाराची आवश्यकता असते. (हेही वाचा, Mumbai: सायन रुग्णालयातील डॉक्टरांची 15 वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया; मानेतून आणि खांद्यामधून काढली 2.5 किलोची गाठ)

सायन हॉस्पिटलच्या मिल्क बँकेकडून 4,184 लिटर दूध संकलन

बाळाच्या जन्मानंतर जे पहिले दूध प्यायले जाते, ते पोषक आणि प्रतिपिंडांनी समृद्ध असते. जे संसर्गाशी लढण्यास आणि नवजात बालकांचे संरक्षण करण्यास मदत करते. तथापि, काही नवीन मातांना वैद्यकीय समस्यांमुळे दूध उत्पादनात आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांच्या बाळांना मिल्क बँकेचा खूप फायदा होतो. सन 2019 ते 2024 या कालावधीत सायन हॉस्पिटलच्या मिल्क बँकेने 4,184 लिटर दूध संकलन केले, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

दूध दान प्रक्रियेमध्ये दात्याच्या आईच्या दुधाची संपूर्ण चाचणी समाविष्ट असते. जे नंतर कोणतेही जीवाणू नष्ट करण्यासाठी पाश्चराइज्ड केले जाते आणि फ्रीजरमध्ये -20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात साठवले जाते. बहुतेक दुधाचे दान रुग्णालयांतून येते. तर काही माता ज्यांचा जास्त पुरवठा आहे, ते घरूनही दान करतात. दर महिन्याला, सायन हॉस्पिटलला घरून दूध दान करू इच्छिणाऱ्या मातांचे फोन येतात आणि हॉस्पिटलचे कर्मचारी ते गोळा करण्याची व्यवस्था करतात. उल्लेखनिय असे की, महिलांच्या या योगदानामुळे अनेक नवजात आणि माता दुरावलेल्या बालकांना या दूधाचा फायदा होतो. अनेकदा काही बालके बेवारस सापडतात, काहींच्या मातांना दूध नसते, काहींच्या मातांना शारीरिक व्याधीमुळेही स्तनपान करता येत नाही, अशा बालकांना या दुधाचा विशेष फायदा होतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif