Ramdas Athawale: अशोक चव्हाणांनी रिपब्लिकन पक्षात यावं, रामदास आठवलेंची ऑफर

अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना ऑफर दिली आहे.

Ramdas Athawale | (Image Credit - Twitter)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना ऑफर दिली आहे.  ( Ashok Chavan on BJP: काँग्रेस सोडण्याचे कारण काय? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा, असे आवाहन मी त्यांना करतो, असे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात मी त्यांचं स्वागत करेन. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांच्या पक्षात तुम्ही यावं असे देखील आठवले यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील हायकमांड अलर्ट मोडवर आले आहे. राज्यातील काँग्रेसच्या आमदारांसोबत तातडीने संपर्क करण्याच्या सूचना हायकमांडकडून देण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम यांच्याकडून काँग्रेसच्या आमदारांना फोन करण्यात आले आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement