वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैद्य अंमली पदार्थांच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आशिष शेलार यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. या ठिकाणांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी पत्राद्वारे मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात चर्चेत आलेल्या अवैद्य अमंली पदार्थांचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात असल्याचा दावा भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. या ठिकाणांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी पत्राद्वारे मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) केली आहे.
सुशांतच्या प्रकरणात चर्चेत आलेल्या अवैद्य अंमली पदार्थांचे अनेक अड्डे माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात असून त्याकडे मी वारंवार पोलीस, संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधतो आहे. पण कारवाई होत नाही. आज पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - आरोग्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा; सोशल मीडिया पोस्टवरून सांगितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक)
दरम्यान, आशिष शेलार यांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील बेकायदा अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात मी सातत्याने पोलिसांचे लक्ष वेधत आहे. यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल डीसीपी, अँटी नार्कोटिक्स सेलला 14 मार्च रोजी मी पत्र लिहिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही किंवा कारवाई झाली असल्यास त्याबाबत मला कल्पना दिली गेलेली नाही.'
ड्रग्जच्या व्यसनामुळे देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरुद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तीशी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्रविरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबईवर मुख्य लक्ष्य आहे. माझ्या वांद्रे, खार, सांताक्रूझ या मतदारसंघात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत, जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पब पैकी बर्याच जणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाइटलाइफ पार्ट्या सुरू असतात. हीच ठिकाणे दुर्दैवाने बेकायदेशीर ड्रगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने हे सारे राजरोसपणे सुरू आहे,' असंही आशिष शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे.
1990 च्या दशकात मुंबई पोलिसांनी जसे अंडरवर्ल्ड नष्ट केले, त्याचप्रमाणे ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हातीघेणे आवश्यक आहे. अशा नेटवर्कशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची गरज आहे. सुशांतसिंहच्या साथीदारांनी वापरलेले बेकायदेशीर ड्रग्ज वांद्र्यातीलच काही ठिकाणांहून आणले गेले असावे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य आता तरी लक्षात घ्यायला हवे. माझ्या मतदारसंघातील बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या अ़ड्ड्यांबाबत मी अनेकदा नावानिशी तक्रार केली आहे. पुन्हा एकदा आपल्याला याबाबत विनंती करीत आहे. हे अड्डे उद्ध्वस्त करून सुशांतसारख्या इतर हजारो तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यातून सोडवावे, अशी विनंतीदेखील शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.