Ashish Shelar On Supreme Court: अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले विशेष आभार

यानंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विट हँडलवरून न्यायालयाचे विशेष आभार मानले आहेत. यात त्यांनी #Arnabisback असा हॅशटॅगही वापरला आहे.

Ashish Shelar (PC - PTI)

Ashish Shelar On Supreme Court: आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन (Bail) मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामींला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी सूचनादेखील दिली आहे. त्यानंतर अर्णब यांची सुटका करण्यात आली आहे. यानंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विट हँडलवरून न्यायालयाचे विशेष आभार मानले आहेत. यात त्यांनी #Arnabisback असा हॅशटॅगही वापरला आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना म्हटलं आहे की, 'धन्यवाद आदरणीय सुप्रीम कोर्ट. कायद्याचं राज्य कायम आहे. त्यामुळे न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही.' यावेळी शेलार यांनी #Arnabisback हा हॅशटॅग वापरला आहे. (हेही वाचा - Arnab Goswami Bail Plea in Supreme Court: अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टावरही ओढले ताशेरे)

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर 2 जणांना देखील अंतरिम जामीन देण्यात आला आहे. 50 हजारांच्या जामिनावर या सर्वांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वास्तुविषारत अन्वय नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या अर्नब गोस्वामी यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने अर्नब यांची जामीन याचिका फेटाळून लावली होती.

त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचंही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.