महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? राज्यातील शिक्षणसंस्थेबाबात झालेल्या गोंधळावरून आशिष शेलारांचा सरकाराला सवाल

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी असा सवाल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला केला आहे.

Ashish Shelar And Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव टाळण्यासाठी मागील 8 महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुंबई, ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावरुन राज्य सरकार सध्या संभ्रमावस्थेत दिसत आहे. त्यात शाळा सुरु करण्याबाबत, फी वाढीबाबत ही राज्य सरकारची निश्चितता दिसत नाहीय. यामुळे महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी असा सवाल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला केला आहे.

शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच..पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही.शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.हेदेखील वाचा- Devendra Fadnavis: महाविकास आघाडी हे पलटूराम सरकार; देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टिका

'परीक्षा घेण्यावरुन संभ्रम, परीक्षा घेतल्या त्यात पालक विद्यार्थ्यांना मनस्ताप..

अँडमिशवरुन गोंधळ... फी वाढीबाबत हतबलता...अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह..

शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ...महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी? असे सांगत सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती मागील काही महिन्यात आटोक्यात आली असताना आता हळूहळू राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा स्थितीत शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार संभ्रमावस्थेत आहे. यामुळे राज्य सरकारची पुढे काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.