'प्रबोधन मधील प्रबोधनकार' प्रकाशन कार्यक्रमासंदर्भात आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली 'ही' विनंती

या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचार नुसार सन्मान करण्याबाबतची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Ashish Shelar & CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

'प्रबोधनमधील प्रबोधनकार' या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्र लिहिले आहे. 16 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचार नुसार सन्मान करण्याबाबतची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसंच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात आशिष शेलार यांनी लिहिले की, "शासनाच्या साहित्य संस्कृती महामंडळ आणि मराठी भाषा प्रबोधन मधील प्रबोधनकार या ग्रंथ प्रकल्पाची निर्मिती केल्याने महाराष्ट्राच्या अमूल्य साहित्य जतनामध्ये मोठी भर पडेल. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल शासनाचे आणि आपले आभार. नव्या पीढीसमोर प्रबोधनकारांचे विचार आणणे ते पोहचवणे ही काळाची गरजच आहे. या उपक्रमातून महाराष्ट्राचा अनमोल ठेवा वाचकांना खुला होणार आहे, याचा आनंदच आहे. या ग्रंथाचे प्रकाशन आणइ स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक संकेतस्थळाचे लोकर्पण 16 ऑक्टोबरला होत असल्याचे शासनाने जाहीर केले. मात्र प्रथेप्रमाणे विरोधी पक्षनेत्यांही आमंत्रित केले असते तर आनंद झाला असता."

आशिष शेलार ट्विट:

(हे ही वाचा: महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेवरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी 'या' शब्दांत केली टीका)

पुढे त्यांनी या कार्यक्रमाला राज ठाकरे यांना आमंत्रित करण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी लिहिले की, "प्रबोधनकारांचा वारसा आणि व्यासंग असलेले त्यांचे नातू मा. राज ठाकरे यांना या कार्यक्रमाला राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करुन एक चांगला संदेश शासनाला देता आला असता अथवा देता येऊ शकतो. मात्र आमंत्रण स्वीकारावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. मी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे जाज्वल्य विचार ऐकले आहेत. त्यावर त्यांचे असलेले नितांत प्रेम, आदर आणि व्यासंग मी अनुभवला आहे. त्यामुळे व्यासपीठावर आपल्यासोबत ते ही असतील तर एक संस्मरमीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल."

त्याचबरोबर प्रबोधनकारांचे पणतू आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमात व्हावा, अशीही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.