Ashish Shelar on Shiv Sena: 'उखाड दिया' ची भाषा करणारे सत्तेसाठी लाचार; आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका
औरंगजेब प्रिय असणाऱ्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असे त्यांनी म्हटले आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद च्या (Aurangabad) नामांतरणावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच सत्र सुरु आहे. काँग्रेसने (Congress) औरंगाबाद चं नामांतर करण्यास विरोध दर्शवला आहे. तर नामांतर करत नाही म्हणून भाजपने (BJP) शिवसेनेवर (ShivSena) टीका करत आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून काँग्रेसला चिमटा काढला आहे. औरंगजेब प्रिय असणाऱ्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत असे त्यांनी म्हटले आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचारी करत असून ही पापं कुठं फेडाल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. (औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत निर्णय याआधीच घेण्यात आला आहे- खासदार संजय राऊत)
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा "उखाड दिया" ची भाषा. आणि आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच. काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”!सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी? (Saamana Editorial: औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला)
आशिष शेलार ट्विट:
दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, आपल्यासाठी ते संभाजीनगर आहे आणि तसेच राहतील, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. हा लोकांच्या भावनांचा विषय आहे. म्हणून आम्ही यावर चर्चा करू शकतो पण निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे