Ashadhi Yatra 2025: पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना

आषाढी यात्रा काळात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी स्वतःपासून त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात केली आहे. यामध्ये गोरे चालत मंदिरात गेले. सर्वसामान्य भाविकांच्या सोबत मुखदर्शन घेतले.

Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

6 जुलै दिवशी आषाढी एकदशी (Ashadhi  Ekadashi) साठी वारकर्‍यांची (Warkari) तयारी सुरू झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा निमित्त येणार्‍या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरामध्ये नो व्हेईकल झोन असेल तसेच मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हीआयपींनी शिवाजी महाराज चौकातून चालत मंदिराकडे यावे, असे आवाहन केले आहे. आमदार, खासदारांचे ताफे मंदिरापर्यंत येतात त्यामुळे सामान्य भाविकांना फटका बसतो. यंदा आषाढीला मुख्यमंत्री वगळता सर्वांसाठी नो व्हेईकल झोन असणार आहे.

मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या ठिकाणी देखील त्यांनी पाहणी केली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक सुविधांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला आहे. मंदिर परिसरामध्ये साडेसात लाख स्क्वेअर फुटाचे वॉटरप्रूफ मंडप ठीक ठिकाणी मार्गावर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. Special Buses For Ashadi Ekadashi Yatra: भविकांना दिलासा! यंदा आषाढी एकादशी यात्रेसाठी परिवहन महामंडळ चालवणार 5,200 विशेष बसेस, जाणून घ्या सविस्तर .

यंदा आषाढी एकदशी निमित्त वारकर्‍यांच्या सोयीसाठी अनेक सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत. यामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय बेस्ड ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. पायी वारी करणार्‍यांसाठी विशेषज्ञ, डॉक्टर, नर्स यांची सेवा दिली जाईल. वारी दरम्यान 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांना प्राथमिक आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement