देशात काँग्रेस शक्तिहीन, कॅल्शिअमचे इंजेक्शन देऊनही उपयोग नाही- असदुद्दीन ओवैसी

ओवेसी यांनी या सभेत कॉंग्रेस (Congress Party) पक्षावर टीका करत अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

Asaduddin Owaisi (Photo Credit: PTI)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2019) एमआयएमचे (MIM) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची पुणे (Pune) येथे सभा पार पडली. ओवेसी यांनी या सभेत कॉंग्रेस (Congress Party) पक्षावर टीका करत अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हीना मोमीन, हडपसर मतदारसंघाचे उमेदवार जाहीद शेख, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॅनियल लांडगे हे उपस्थित होते.

नुकतीच पुणे येथे पार पडलेल्या सभेत ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा पक्ष शक्तिहीन झाला आहे. तसेच काँग्रेस पक्षाला कॅल्शिअमचे इंजेक्शन दिले तरी, काही उपयोग होणार नाही, अशा शब्दात ओवेसी यांनी काँग्रेसच्या पक्षावर जोरदार टिका केली आहे. भारतात भाजपची सत्ता आल्यापासून मॉब लिंचिंग सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. परंतु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात जाऊन भारतात सर्व काही ठिक आहे, असा खोटा प्रचार करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे देशातील जनतेला एमआयएम पक्ष हा सक्षम पर्याय वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- हे देखील वाचा-Maharashtra Assembly Election 2019: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

आजवर जे राजकीय पक्ष सत्तेवर आले आहेत, अशा एकाही पक्षाने दलित समाजातील व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. परंतु, एमआयएम पक्ष सत्तेवर आल्यावर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. तसेच हा पक्ष सर्व समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेवून जाणार असल्याचे अश्वासन ओवैसी यांनी दिले.