Aryan Khan Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवून महिलेने क्रुजवर ड्रग्ज नेल्याचा NCB कडून मोठा खुलासा
त्यानुसार एक महिला आपल्या सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून जहाजावर घेऊन गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Aryan Khan Drugs Case: क्रुज ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने शनिवारी एक मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार एक महिला आपल्या सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून जहाजावर घेऊन गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी एनसीबीने चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना सुद्धा नोटीस धाडत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. तसेच शनिवारी एनसीबीने शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रायव्हरची सुद्धा चौकशी केली.
मुंबईतील एका दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खानसह 7 अन्य लोकांना 15 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. आर्यन खान याचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वी कोर्टात असे म्हटले की, आर्यन खानला क्रुज पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण त्याकडे कोणताही बोर्डिंग पास नव्हता. तसेच त्याची जहाजामध्ये कोणतीही सीट किंवा केबिन सुद्धा नव्हते. दुसरी गोष्ट अशी की, अटक करताना त्याच्याकडे काहीच मिळाले नाही. आर्यन खान याला केवळ चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली आहे.(Cruise Ship Drug Case: ड्रग्ज प्रकरणात Aryan Khan ची रवानगी Arthur Road Jail मध्ये)
खरंतर एनसीबीने 2 ऑक्टोंबरला समुद्राच्या मार्गाने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुज जहाजावर छापेमारी केली होती. तेथे शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही लोक रेव पार्टी करत होते. या पार्टीमध्ये सहभागी झालेले सर्व लोकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सेवन केले होते. छापेमारी दरम्यान पोलिसांनी आर्यन खानसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान,आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जेंट यांना एनसीबीने क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच जणांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीच्या आधारे एनसीबीने ड्रग पॅडलर आणि इतरांना पकडले आहे. एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान आणि इतर 7 आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.