NCB Suspended Two Officers: आर्यन खान ड्रग प्रकरणी एनसीबीने दोन अधिकाऱ्यांना केलं निलंबित

या आदेशानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर संशयास्पद कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप आहे.

Cruise ship party case (Photo Credits-ANI)

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई करत आपल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अहवालानुसार, हे दोन्ही अधिकारी क्रूझ प्रकरणातील तपासाचा भाग होते ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संशयित ड्रग प्रकरणात अडकला होता. क्रूझवर सर्च ऑपरेशन दरम्यान ड्रग्ज सापडल्यानंतर आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. व्हीव्ही सिंह आणि आशिष रंजन प्रसाद अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे असल्याचे अहवालात म्हटले आहे. या आदेशानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर संशयास्पद कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप आहे.

26 दिवस होता तुरुगांत

आर्यन खानला गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीच्या पथकाने छापा टाकला. झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात आर्यन खानसह अनेकांना अटक करण्यात आली.

एनसीबीने त्यांच्यावर आरोप केला होता की या लोकांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि त्याबद्दल कट रचला होता. 26 दिवसांनी अनेक कोर्टात एकामागून एक खटल्याची सुनावणी होऊन 28 ऑक्टोबरला आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरुंगातून बाहेर आला होता.

राजकीय मुद्दा बनला

आर्यन खानवर क्रूझमध्ये प्रतिबंधित ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप होता. आर्यन खानशिवाय अन्य 19 जणांनाही आरोपी करण्यात आले होते. या लोकांविरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. (हे देखील वाचा: Sonam Kapoor House Burglary Case: परिचारिकाने 2.41 कोटींचे चोरले दागिने, सत्य जाणून तुम्ही व्हाल थक्क)

विशेष म्हणजे आर्यन खान प्रकरणाबाबत नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांनी तर आर्यन खानला मुस्लिम असल्याने त्रास दिला जात असल्याचे सांगितले. एनसीबीच्या मुंबई झोनचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. या मुद्द्यावर अनेक नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.