Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणात गौप्यस्फोट, KP Gosavi याचे सहाय्यक प्रभाकर सेल यांचा एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
प्रभाकर
आर्यन खान (Aryan Khan Case) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक (Nawab Malik) हे आतापर्यंत विविध कागदपत्रांच्या आधारे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) वर आरोप करत होते. मात्र, आता या प्रकरणाला जोरदार वळण मिळाले आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईतील एकूण साक्षीदारांपैकी फरार असलेल्या केपी गोसावी (KP Gosavi) याच्या सहकाऱ्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. प्रभाकर सेल (Prabhakar Sail) असे या सहकाऱ्याचे नाव आहे. प्रभाकर सेल हे केपी गोसावी याचा खासगी सुरक्षारक्षक असल्याचे सांगतात. सेल यांनी एनसबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि केपी गोसावी यांनी आपल्याला क्रुज ड्रग्ज छापा प्रकरणात साक्षीदार केले. मात्र, त्यांनी आपल्या कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्याचे म्हटले आहे. या आरोपांवर एनसीबी NCB काय प्रतिक्रिया देते याबाबत उत्सुकता आहे.
केपी गोसावी याचा साक्षीदार असलेले प्रभाकर सेल हे एनसीबीने केलेल्या क्रुझ छापेमारी प्रकरणतील एकूण 9 साक्षीदारांपैकी एक आहेत. केपी गोसावी आणि आर्यन खान यांचा एक सेल्फी फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रभाकर सेल हे बेपत्ता होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपण फरार झालो होतो, असा दावा प्रभाकर सेल यांनी केला आहे. प्रभाकर सेल यांनी इंडिया टूडे सोबत बोलताना हा दावा केला. (हेही वाचा, Shah Rukh Khan याने भाजपात प्रवेश केला तर ड्रग्ज सुद्धा साखरेची पावडर होईल, छगन भुजबळ यांचा केंद्राला टोला)
ट्विट
प्रभाकर सेल यांनी दावा केला आहे की, ते केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होते. एनसीबीने क्रुझवर छापेमारी मारत ज्या रात्री कारवाई केली. त्या रात्री केपी गोसावी यांच्यासोबत ते स्वत: हजर होते. केपी गोसावी आणि समीर वानखेडे यांनी त्यांना कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या. क्रुझवर झालेल्या जप्तीच्या कारवाईबद्दल आपल्याला माहिती नसल्याचा दावाही प्रभाकर सेल यांनी केला आहे. सेल यांनी अनेक खुलासे करत गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तसेच, एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता एनसीबी काय प्रतिक्रिया देते याबाबत उत्सुकता आहे.