Arvind Sawant Apologises to Shaina NC: 'इम्पोर्टेड माल' च्या टीपण्णी मुळे वादात आलेल्या अरविंद सावंत यांनी मागितली शायना एनसी यांची माफी
अरविंद सावंत यांनी यापूर्वी आशिष शेलार, वामन म्हात्रे, संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील आधार देत त्यांच्यावर कोणती कारवाई केली आहे? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शायना एन सी (Shaina NC) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीप्पणी वर आपली माफी मागितली आहे त्यांना 'माल' असा उल्लेख केल्याने शायना एन सी यांनी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवली होती. शायना एन सी या सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मुंबादेवी विधानसभेच्या उमेदवार आहेत. एकनाथ शिंदेंकडून शिवसेना पक्षाकडून महायुतीच्या उमेदवार आहेत. प्रचारादरम्यान बोलताना 72 वर्षीय अरविंद सावंत यांनी शायना एन सी या भाजपाच्या नेत्यांना शिवसेना पक्षाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर 'त्यांच्यासारख्या इम्पोर्टेल लोकांना नागरिक स्वीकारणार नाही. निवडणूकीत इम्पोर्टेड माल चालत नाही' असं विधान केले होते.
अरविंद सावंत यांच्या या विधानावर भडकून शायना यांना ' मी महिला आहे माल नाही.' असं विधान केले. त्यानंतर त्यांनी नागापाडा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवली होती. सावंत यांच्या आक्षेपार्ह टीपण्णी नंतर 'मला कोणत्याही महिलेला दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणत्याही आई, बहीणी विरूद्ध मी आक्षेपार्ह कधीच वक्तव्य केलेले नाही. पण माझ्या वक्तव्याने काही गैर समज झाले असतील तर मी माफी मागतो' असे ते म्हणाले आहेत. Shaina NC on Arvind Sawant's Sexist Remark: 'मी महिला आहे माल नाही' अरविंद सावंत यांच्या टीपण्णी वर भडकल्या शायना एन सी .
दरम्यान अरविंद सावंत यांनी यापूर्वी आशिष शेलार, वामन म्हात्रे, संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील आधार देत त्यांच्यावर कोणती कारवाई केली आहे? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. "ज्या पद्धतीने हे वक्तव्य देण्यात आले आहे, त्याचा चुकीचा अर्थ काढून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. त्याबद्दल मी दु:खी आहे. पण तरीही माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी माफी मागतो. मी त्यांचा आदर करतो. मी माझ्या काळात कधीही तुमचा अपमान केलेला नाही. ५५ वर्षे राजकारणात झाली, मी आजही अपमान करणार नाही आणि उद्याही करणार नाही.
शायना एन सी यांनी मविआ निवडणूक निकालानंतर बेहाल होणार असल्याची टीपण्णी करत एकेकाळी आम्हीच तुमच्यासाठी प्रचार करून तुम्हांला खासदार केले आहे याची आठवण ठेवायला हवी होती असं म्हटलं आहे.