COVID19 शी लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची Immunity वाढवण्यासाठी सरकार देणार Arsenicum Album 30 आणि Camphora 1m या औषधांचे डोस

COVID19 शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सरकारतर्फे कॅम्फोर 1 एम (Camphora 1m) आणि आर्सेनिक अल्ब 30 (Arsenicum Album 30) या दोन औषधांचे डोस देण्यात येणार असल्याचे समजत आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

COVID19 शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police)  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सरकारतर्फे कॅम्फोर 1 एम (Camphora 1m) आणि आर्सेनिक अल्ब 30 (Arsenicum Album 30) या दोन औषधांचे डोस देण्यात येणार असल्याचे समजत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत, 1206 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 283 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी पोलिसांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, ही औषधे होमीओपॅथिक (Homeopathic) असून  याचा उपयोग केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आहे त्याचा कोरोनावरील उपचार म्हणून वापर नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यांचे डोस आयुष मंत्रालयाच्या सुचानांना फॉलो करून दिले जात आहेत.  ही औषधे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सुद्धा दिली जात आहेत. Lockdown Extension In Maharashtra: महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉक डाऊन कायम!

अतिरिक्त पोलिस महासंचालक एस जगन्नाथन यांच्या माहितीनुसार, "प्रतिबंधात्मक उपाय" म्हणून, रिकाम्या पोटावर दोन दिवसांसाठी कॅम्फोर 1 एम च्या चार गोळ्या दिवसातून दोनदा घ्याव्यात. हे औषध लहान मुलांसाठी सुद्धा सुरक्षित आहे. कोरोना व्हायरसच्या प्रभावित भागात तैनात असलेल्या पोलिस कर्मचा्यांना चार ते पाच दिवस दररोज चार तुकड्यांचा एक डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर कोविड -19 ची लक्षणे असलेल्या डॉक्टरांना योग्य डोससाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असा सल्ला दिला आहे, "ही दोन्ही औषधे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. इतर अनेक राज्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही औषधे देण्यास सुरुवात केली आहे. "

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विषाणूजन्य संसर्ग आणि उपचारासंदर्भात सरकारी तसेच खासगी रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी दोन समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या सर्व रोग्यांना नियंत्रण व उपचारासंदर्भात शासन स्तरावर घेतलेल्या निर्णयांची माहिती देतील. ते आरोग्य कर्मचार्‍यांची सामाजिक सुरक्षा देखील पाहतील. या समित्या राज्य व जिल्हा पातळीवर स्थापन केल्या जातील. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे नेतृत्व करतील आणि जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समितीचे नेतृत्व जिल्हाधिकारी करतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif