Arogya Vibhag Maharashtra Admit Card 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये ग्रुप सी, डी साठी होणार्‍या परीक्षांच्या हॉल तिकीट्स जारी; arogya.maharashtra.gov.in वरून अशी करा डाऊनलोड

त्यासाठी हॉलतिकीट nrhm.maharashtra.gov.in किंवा arogya.maharashtra.gov.in वरून डाऊनलोड करता येईल.

online ((Photo Credits: Pexels)

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये Maharashtra National Rural Health Mission कडून ग्रुप सी (Group C) आणि ग्रुप डी (Group D) साठी होणार्‍या परीक्षांचं अ‍ॅडमीट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आलं आहे. यंदा 25 आणि 26 सप्टेंबर दिवशी या परीक्षा होणार आहेत. यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता अ‍ॅडमीट कार्ड अधिकृत वेबसाईट nrhm.maharashtra.gov.in किंवा arogya.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे. परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आरोग्य विभागाचं हॉल तिकीट आवश्यक आहे. याशिवाय परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी युजरनेम, पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड आवश्यक असणार आहे. मग यांचा वापर करून तुमचं अ‍ॅडमीट कार्ड कसं डाऊनलोड करायचं हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

कसं डाऊनलोड कराल Arogya Vibhag Bharti Hall Ticket 2021?

महाराष्ट्र आरोग्य विभागात या भरती प्रक्रियेद्वारा ग्रुप सी मध्ये 2725 तर ग्रुप डी मध्ये 3466 जागा भरल्या जाणार आहेत. हाऊस कीपर, ड्रेसर, स्टोअर गार्ड, लॅब सायंटीस्ट ऑफिसर, लॅब असिस्टंट या पदांसाठी नोकरभरती होणार आहे. कोविड नियमावलीचं पालन करत या पदांसाठी होणारी परीक्षा पेन अ‍ॅण्ड पेपर मोड मध्ये होणार आहे. (नक्की वाचा:Maharashtra State Eligibility Test 2021 Hall Tickets जारी; setexam.unipune.ac.in वरून अशी करा डाऊनलोड).

उमेदवारांना हॉल तिकीटाची हार्ड कॉपी, फोटो आयकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवणं गरजेचे आहे.