Arnala Porn Racket: पॉर्न अ‍ॅप वर सहा होतकरू अभिनेत्रींचे अश्लील व्हिडिओज अपलोड; अर्नाळा मधील घटना

अनुज कुमार जैस्वाल (30), सरजू कुमार विश्वकर्मा (25) आणि एका 33 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.

Porn video

सहा होतकरू अभिनेत्रींनी पोर्नोग्राफी अ‍ॅपच्या मेकर्स आणि त्याच्या सहकार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऑडिशनच्या नावाखाली नावाखाली अश्लिल व्हिडिओ शूट करून तो पॉर्न साईट वर अपलोड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. Kotha या पॉर्न अ‍ॅप वर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या अ‍ॅप वर 500 पेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. Crime Branch of Nalasopara police कडून चार्जशीट दाखल झाल्यानंतर याबाबत खुलासा झाला आहे.

चार्जशीट मध्ये सहा पीडीत मुलींची स्टेंटमेट्स आहेत तसेच अश्लील व्हिडिओ देखील सॅम्पल आहे. डिसेंबर 2023 मध्ये हा प्रकार समोर आला होता. जेव्हा 18 वर्षीय अभिनेत्रींनी पोलिसांना माहिती दिली की विरार च्या अर्नाळा मध्ये महिला मेक अप आर्टिस्ट आणि 2 जणांनी यांना एका बंगल्यावर बोलावले होते. त्यांना एका वेब सीरीजची ऑडिशन असल्याचं सांगितलं. बॉयफ्रेंड सोबत एका विशिष्ट पोझिशन मध्ये त्यांनी अनेकदा रिटेक्स घेतले. तिची निवड झाली तर तिला पुन्हा कॉन्टॅक्ट केले जाईल असेही सांगितलं. पण तिला हा व्हिडिओ Kotha porn app वर दिसला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखा 3 कडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर अनुज कुमार जैस्वाल (30), सरजू कुमार विश्वकर्मा (25) आणि एका 33 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. आरोपींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी नंतर अश्लील चित्रीकरणाच्या प्रकरणातील प्रमुख नियाज अली नावाच्या कास्टिंग डायरेक्टरला अटक केली. या प्रकरणात आणखी पाच महिलांनी त्याच आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आल्या होत्या ज्यांनी कोठा ॲपवर त्यांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ पोस्ट केले होते.

पोलिस तपासानुसार, कास्टिंग डायरेक्टर म्हणून बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या अलीने सॉफ्टवेअर तज्ञांच्या मदतीने हे ॲप बनवले होते आणि ते ऑनलाइन प्रसिद्ध केले होते. त्याचे तीन साथीदार होते, एक कॅमेरामन, एक मेक-अप आर्टिस्ट आणि अजून एक व्यक्ती जो दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यानंतर या टोळीने एका इच्छुक अभिनेत्रीशी संपर्क साधला. या टोळीने बनावट वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी महिलांना विरारमधील अर्नाळा बीचजवळील रिसॉर्टमध्ये बोलावले. सुरूवातीला ऑडिशन घेतल्यानंतर, टोळीने अभिनेत्रीला intimate scenes ऑडिशन देण्यासाठी बॉयफ्रेंड सोबत परत येण्यास सांगितले. त्यानंतर टोळीने जोडप्याला सेक्स करण्यास सांगितले जे त्यांनी चित्रित केले आणि ते नंतर हटवले जातील असे सांगितले. त्यानंतर अभिनेत्रीला सांगण्यात आले की वेब सीरिजसाठी तिची निवड झाल्यास तिच्याशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर अलीने कोठा ॲपवर दृश्ये अपलोड केली. कोठा ॲप 5 महिन्यांत बंद झाले आहे.