Covaxin Plant in Pune: तिसऱ्या लाटेआधी ठाकरे सरकारची तयारी, पुण्यात Bharat Biotech चा कोवाक्सिन प्रकल्प उभारण्यास मिळाली मंजूरी
हे काम लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
Covaxin Plant in Pune: कोरोना महामारीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कंबर कसली आहे. तिसऱ्या लाटेला सामोर जाण्यासाठी ठाकरे सरकार तयारी करत आहे. आता पुण्यात भारत बायोटेक कोव्हॅक्सिन प्रकल्प (Covaxin Plant) स्थापित करणार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी जमीन शोधण्याचे काम पुणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले आहे.
पुण्यात भारत बायोटेक लस संयंत्र उभारणीसंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यांनी यासाठी जमीन शोधण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. हे काम लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले की, लसीकरण अभियान अधिक तीव्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. (वाचा - Bharat Biotech च्या Covaxin ला 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी)
दरम्यान, तिसर्या लाटेपूर्वी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील धारावी साखर गिरणी इथेनॉल प्लांटद्वारे ऑक्सिजनचे उत्पादनही सुरू असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, आधुनिक तंत्रज्ञानासह या साखर कारखान्यात दररोज सुमारे 4 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे.
याद्वारे दररोज सुमारे 300 ऑक्सिजन सिलिंडर भरले जातील. राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विविध जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पीएसएच्या 300 हून अधिक तंत्र खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या 1,250 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे.