लिंबूवर्गीय फळांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आणि मूल्य वर्धित उत्पादनासाठी ICAR-CCRI Nagpur आणि APEDA मध्ये सामंजस्य करार

सामंजस्य कराराचा उद्देश शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी त्याची जोडणी करणे हा आहे.

APEDA signs MoU with ICAR-Central Citrus Research Institute | PC: PIB

लिंबूवर्गीय फळांच्या निर्यातीला प्रोत्साहन आणि त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने, भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था (ICAR-CCRI) नागपूर समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उत्पादन विशिष्ट क्लस्टर तसेच प्रभावी शेतीवर लक्ष केंद्रित करत अपेडा आणि आयसीएआर-सीसीआरआयकडून तंत्रज्ञानाचा विकास या सामंजस्य करारा मध्ये अपेक्षित आहे. निर्यातीत वैविध्य आणत आणि जागतिक स्तरावर ब्रान्ड इंडिया सुस्थापित करत उच्च मूल्य कृषी उत्पादन निर्यातीला चालना देण्यावर हा सामंजस्य करार लक्ष केंद्रित करणार आहे.

उत्पादन विकास कार्यामध्ये क्षेत्र डीजीटायझेशन, गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना, सेंद्रिय शेतांचा विकास यांचा समावेश असल्याचे या सामंजस्य करारात म्हटले आहे. कृषी व्यवसाय आणि निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा आणि आयसीएआर-सीसीआरआय, शेतकरी, उद्योजक, निर्यातदार आणि इतर संबंधीतांसाठी क्षमता वृद्धीसाठी कार्यक्रम आयोजित करणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि अपेडाचे अध्यक्ष डॉ एम अंगमुथू यांच्या उपस्थितीत नुकत्याच स्वाक्षऱ्या झालेल्या या सामंजस्य कराराचा उद्देश शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी त्याची जोडणी करणे हा आहे.

हवामानाशी मिळती जुळती शेती, ब्लॉक चें तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या आवश्यकतानुरूप व्यवसाय मॉडेलला आकार देणे या हेतूने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

संबंधित राज्ये आणि जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक संस्था किंवा स्वयंसेवी संस्थाच्या सहयोगाने कृषी स्तरावरच्या निर्यात केंद्री घडामोडी व्यापक करण्यात येतील. नक्की वाचा: अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला मिळाला GI Tag.

ज्या देशांमध्ये निर्यात केली जात आहे त्या देशांकरिता उत्तम मालाच्या कटिबद्धतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुरवातीपासून ते अंतिम टोकापर्यंत शाश्वत मूल्य साखळी विकसित करणे असा या कराराचा उद्देश आहे. त्याचबरोबर भौगोलिक संकेतक हा टॅग प्राप्त नागपूर संत्र्यांच्या आणि महाराष्ट्रातल्या सेंद्रिय लिंबूवर्गीय उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार झाला आहे. कीटक आणि रोग यासारख्या निर्यातीत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठीही आयसीएआर-सीसीआरआय योगदान देणार आहे.