Antop Hill Child Trafficking Case: जन्मदात्या पित्याने आईच्या मृत्यू पश्चात दीड वर्षाच्या मुलाला विकलं; मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल
तस्करी झालेल्या बाळाच्या आजोबांच्या तक्रारी वरून वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली.
मुंबई (Mumbai) मध्ये जन्मदात्या बापाने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या निधनानंतर आपल्या मुलाला विकल्याचं समोर आलं आहे. यामध्ये आरोपी पित्यासह चार जणांविरूद्ध मानवी तस्करी प्रकरणी (Child Trafficking) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंबई मधील अॅन्टॉप हिल (Antop Hill) भागातील आहे. आजोबांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे.
वडाळा पूर्व मध्ये अॅन्टॉप हिल भागातील विजय नगर इथे अमन धीरेन सरदार यांची मुलगी काजल राहत होती. काजल चा आरोपी अनिल पूर्वया सोबत विवाह झाला होता. काजल- अनिल यांना शिवम नावाचा मुलगा होता. पण काही दिवसांपूर्वी काजलचा मृत्यू झाला. काजलच्या पश्चात चिमुकला वडीलांसोबत राहत होता. मागील काही दिवसात आजोबा आणि नातवाची भेट होत नव्हती. त्यामुळे आजोबांना संशय आला.
मागील काही दिवसांपासून अमर धीरेन यांचा नातू शिवम यांची भेट झाली नव्हती. जूनपासून अनिलला नातू शिवम बद्दल विचारत होता पण तो उत्तरं टाळत होता. नंतर चौकशी केली असता त्यांच्या जवळ राहणार्या आस्मा शेख यांच्याकडून मुलाला विकल्याचं समोर आलं आहे. नक्की वाचा: Shocking! बापाने पोटच्या नवजात मुलीला 70 हजारांना विकले; पुढे 2 महिन्यात 7 वेळा झाली बाळाची खरेदी-विक्री .
जुलै महिन्यामध्ये घरात नसताना मुलाला शेख कडे नेण्यात आले. त्याने आशा पवार, शरीफ शेख आणि इतर आरोपींच्या मदतीने दीड लाखांमध्ये व्यवहार केला. त्यानंतर आजोबांच्या तक्रारी वरून वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 143 (1) (3) (4), 3 (5) सह बाल न्याय कायदा कलम 81 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.