Mumbai Drugs Case: मुंबईत तीन ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे छापे, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त
ही माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून तेथून एक किलोपेक्षा जास्त चरससह एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना मोठ्या प्रमाणात चरससह अटक केली.
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अँटी नार्कोटिक्स सेलने (Anti Narcotics Cell) मुंबईतील तीन वेगवेगळ्या भागात मोठी कारवाई (Raids At 3 Places) करत दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून पाच अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. पहिल्या कारवाईत नार्कोटिक्स अँटी सेलच्या घाटकोपर युनिटने अडीच किलो चरस जप्त करताना तीन अमली पदार्थ तस्करांना अटक केली. जप्त केलेल्या चरसची किंमत 75 लाख रुपये आहे. गोवंडीतील बैगनवाडी परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थ पुरवठा करणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून तेथून एक किलोपेक्षा जास्त चरससह एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना मोठ्या प्रमाणात चरससह अटक केली.
महिलेच्या पर्समधून अमली पदार्थ जप्त
दुसरी कारवाई अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वरळी युनिटने धारावी परिसरात केली. मुंबईतील धारावी 90 फूट रोडवर एक महिला पर्स घेऊन जात असताना पोलिसांना संशय आला, त्यानंतर पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडून 26 ग्रॅम एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची बाजारपेठेत किंमत 2 लाख 60 हजार रुपये आहे. यानंतर महिला अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली. (हे ही वाचा Mulund Robbery: बंदुकीचा धाक दाखवत मुलुंडमध्ये दिवसा ढवळ्या लाखो रुपयांची चोरी; 8 जणांना अटक (Watch Video))
आफ्रिकन व्यक्तीकडून 22 लाख रुपयांचे अमली पदार्थ केले जप्त
तिसरी कारवाई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने सांताक्रूझ परिसरात केली. युनिटचे अधिकारी सांताक्रूझ परिसरात शोधमोहीम सुरू ठेवत असताना एक आफ्रिकन व्यक्ती त्यांना पाहून पळू लागला. संशयाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 22.50 लाख रुपयांचे एमडीएमए अमली पदार्थ आणि २१.५० लाख रुपयांचे एलएसडी पेपर जप्त करण्यात आले. या वसुलीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, आमच्या वेगवेगळ्या युनिट्सच्या पथकांनी सोमवारी मुंबईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आणि सुमारे दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले, तर एकूण 5 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत. ते म्हणाले की, अमली पदार्थ विरोधी सेलची कारवाई सातत्याने सुरू आहे.