Pune Hit And Run Case: पुण्यातील बोपाडी परिसरात पुन्हा हिट अॅड रन प्रकरण; दोन पोलिसांना अज्ञात वाहनांची धडक, एकाचा मृत्यू

कल्याणीनगरात पोर्शे अपघात प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Pune Hit And Run Case: गेल्या महिन्यांत पुण्यात एका भीषण अपघातात दोन जणांचा जीव गेला. कल्याणीनगरात पोर्शे अपघात प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा हिट अॅड रनचे प्रकरण समोर आले आहे. रविवारी ७ जुलै रोजी हा अपघात झाला. या अपघातात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उडवले आहे. (हेही वाचा- वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील जप्त करण्यात आलेल्या BMW Car ची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम वरळी पोलीस ठाण्यात दाखल, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार. पुणे मुंबई मार्गावर बोपाडी परिसरात एका अज्ञात वाहनाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा पोलिस गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. हा अपघात कशा झाला या संदर्भात नेमकी माहिती समोर आलेली नाही.

समाधान कोळी असं मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पी. सी, शिंदे असं अपघातात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. माहितीनुसार, दोघे ही दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, एका जण जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरु करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. पोलिसांनी समाधान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif