महाराष्ट्र: शेतक-यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांचा यल्गार, 30 जानेवारीपासून उपोषणाला बसणार

आपल्या उपोषणाला पाठिंबा देणा-या आपल्या समर्थकांनी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून यात सहभागी व्हावे असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. शेतक-यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषणाचा बडगा उचलला आहे.

Anna Hazare | (Photo Credits: You Tube)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) देशभरातील शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी पुन्हा एका उपोषणाला बसणार आहेत. येत्या 30 जानेवारीपासून म्हणजेच महात्मा गांधीच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला सुरुवात करणार आहेत. राळेगणसिद्धी (Ralegan-Siddhi) येथून या उपोषणाला सुरुवात होईल. याबाबतचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात आपल्या उपोषणाला पाठिंबा देणा-या आपल्या समर्थकांनी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून यात सहभागी व्हावे असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. शेतक-यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषणाचा बडगा उचलला आहे.

अण्णा हजारे यांनी लिहिलेल्या या पत्रकात, "वारंवार आम्ही सरकारकडे आमच्या मागण्या मांडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना मी पाच वेळा पत्र लिहिलं. सरकारचे प्रतिनिधी इथे येऊन चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप या मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता मी ३० जानेवारी २०२१ रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे" असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- Farmers Protest: जो पर्यंत सरकार सोबत बातचीत होत नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही- राकेश टिकैत

तसेच "सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की केवळ मी राळेगणसिद्धी येथून उपोषण करेन तर जे मला समर्थन देऊ इच्छितात त्यांनी आपल्या गावातून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन करावे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे राळेगणसिद्धी येथे गर्दी करणे योग्य ठरणार नाही" असेही त्यांनी म्हटले आहे.

"दिल्लीत जे शेतकरी आंदोलन सुरु आहे, यामध्ये 26 जानेवारी रोजी जी घटना घडली त्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी आहोत. मी कायमच अहिंसात्मक आंदोलन करु इच्छितो. गेल्या 40 वर्षांत मी अनेकदा आंदोलनं केली. 2011 मध्ये दिल्लीत लोकपालसाठी जे आंदोलन झालं. त्यामध्ये लाखोंच्या संख्येने जनतेने सहभाग नोंदवला. मात्र, एकानेही एक दगडही उचलला नाही. शांतता ही आंदोलनाची शक्ती आहे, गांधीजींनी आम्हाला हे शिकवलं आहे. कोणत्याही प्रकारे आंदोलनात हिंसा होता कामा नये," अशी विनंतीही अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना आणि शेतक-यांना केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now