अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांची उडवली खिल्ली; म्हणाल्या, ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?
त्यानुसार आज ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण इडीच्या कार्यलयात उपस्थित राहणार आहेत. परंतु, राज ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संपूर्ण कुंटुंब मिळून देणार आहे का? असा टोलाही अंजली दमानिया यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ईडीची (Income Tax Department) आज चौकशी होणार आहे. त्यानुसार राज ठाकरे कुटुंबासह इडीच्या कार्यालयाकडे रवाना झाल्याचे कळते आहे. याच निम्मिताने समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले आहे का सत्यनारायणाच्या पुजेला? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. दमानिया यांच्या ट्विटवर मनसे कार्यकर्त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
कोहिनूर (Kohinoor) मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण इडीच्या कार्यलयात उपस्थित राहणार आहेत. परंतु, राज ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संपूर्ण कुंटुंब मिळून देणार आहे का? असा टोलाही अंजली दमानिया यांनी लगावला.
राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या दादरच्या कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.