एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता करा- अनिल महाजन

त्यासाठी आमदार एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल महाजन यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता केले तर सरकारमध्ये बदल नक्की घडेल, असा विश्वासही अनिल महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

राज्य सरकारला वटणीवर आणायचे तर सरकारला घाम फोडणारा विरोधी पक्ष नेता हवा. त्यासाठी आमदार एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल महाजन यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता केले तर सरकारमध्ये बदल नक्की घडेल, असा विश्वासही अनिल महाजन यांनी व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात गलीच्छ राजकारण सुरु आहे. राज्य सरकार केवळ राजकारण करण्यात गुंतले असून राज्यातील जनता वाऱ्यावर आहे. राज्यातील हेच गलिच्छ राजकारण कधीपर्यंत सुरु राहणार? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यत सध्या '50 खोके एकदम ओके' अशी चर्चा सुरु आहे. ही चर्चा पुढचे किती काळ चालणार? राज्यात दुसरे कोणतेच विषय नाहीत काय? राज्यासमोर अनेक विषय आहेत. त्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, विद्यार्थी शिष्यवृत्ती ,बेरोजगारी, वाढती महागाई, महामार्गावरील ट्राफिक, जनतेवर लादले जाणारे विविध कर यांसारखे अनेक मुद्दे प्राधान्याने घेणे गरजेचे असताना त्यावर सरकारला कोणीच जाब विचारत नाही. त्यामुळे राज्याच्या विधानपरिषदेत दूरदृष्टी असलेला खंबीर नेता असणे आवश्यक आहे. जो महाराष्ट्राचा इतिहास भूगोल जणतो, सरकारला खडे बोल सुनावू शकतो, अशा विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता आहे. म्हणूनच विधानपरिषदेत एकनाथ खडसे यांना ती जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी अनिल महाजन यांनी केली आहे.

अनिल महाजन पुढे म्हणाले, एकनाथ खडसे हे जनतेचे नेते आहेत. त्यांना चहूबाजूंनी त्रास दिला जातो आहे. परंतू, त्यांच्यावर जनतेचे प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळे त्यांना चिंतेची गरज नाही. त्यांच्याकडे राजकारणाचा आणि समाजकारणाचा समृद्ध अनुभव आहे. त्यामुळे ते अनेक मंत्र्यांना धारेवर धरतात. एकनाथ खडसे यांचा ते विरोधी पक्षनेता असतानाच कार्यकाळ पाहिला तर अनेक सरकारमधील मंत्र्यांना त्यांनी धारेवर धरले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वाखण्याजोगी आहे त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार वर दबाव हवा असेल तर एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद देणे ही काळाची गरज आहे.