Bollywood Drugs Case: महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- गृहमंत्री अनिल देशमुख
बॉलिवूडने जगभरात देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या सोबत आहे असे ट्विट अनिल देशमुख
सुशांत सिंह राजपूत याच्या संशयित मृत्यूचा तपास सुरु असताना CBI समोर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आले. यात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आली. यानंतर लोकांमध्ये बॉलिवूडची प्रतिमा मलीन होऊ लागली आणि संपूर्ण बॉलिवूडलाच लोक दोष देऊ लागले. प्रसारमाध्यमांद्वारे बॉलिवूडबाबत मिळणारी माहिती यामुळे लोकही काही ठराविक माणसांमुळे संपूर्ण बॉलिवूडला दूषणं लावू लागले. मात्र या सर्वावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून खास वक्तव्य केले आहे. बॉलिवूडने जगभरात देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या सोबत आहे असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
'केवळ काही लोकांच्या ड्रग्ज घेण्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचं नाव खराब करणं चुकीचं आहे. जे कोणी ड्रग्ज प्रकरणात सामिल आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत आहे. मात्र, बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे' असे अनिल देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. Congress On NCB: भाजप-बॉलीवुड-सँडलवुड-गोवा ड्रग्ज कनेक्शन याची चौकशी एनसीबी का नाही करत? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल
दरम्यान बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या (Vivek Oberoi) मुंबईमधील घरावर बंगळूरू पोलिसांकडून 15 ऑक्टोबरला छापा टाकण्यात आला असे वृत्त आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, दुपारी 1 च्या सुमारास ही छापेमारी झाली दरम्यान पोलिस विवेकचा मेव्हणा आदित्य अल्वा (Aditya Alva) याची ड्रग्जच्या प्रकरणामध्ये चौकशी आणि तपास करत आहेत.