Anil Deshmukh On Arnab Goswami Arrest: कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही; पोलिसांची कारवाई कायद्यानेच - महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख
महाराष्ट्र पोलिस कायद्यानेच काम करत आहेत. असे ते म्हणाले आहेत.
आज सकाळी रिपब्लिक टीव्ही वृत्त चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अलिबाग पोलिसांकडून मुंबई मध्ये अटक करण्यात आली आहे. दरम्यान ही अटक पोलिस दल आणि सत्ताधार्यांकडून सुडबुद्धीने केल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी आपली प्रतिक्रिया देत पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करताना कायद्यापेक्षा कुणी मोठं नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र पोलिस कायद्यानेच काम करत आहेत. असे ते म्हणाले आहेत. दरम्यान अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक या वास्तूविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अन्वय यांच्या पत्नी अक्षता कडून याप्रकरणी तक्रार दाखल असून त्यांनी व्हिडिओ जारी करत तपासाची मागणी केली होती. कोर्टाने अक्षता नाईक यांना चौकशी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला परवानगी दिली असल्याचेही अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. Devendra Fadnavis On Arnab Goswami: सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक; अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची ट्विटद्वारे टीका.
ANI Tweet
अलिबाग पोलिसांकडून पनवेल येथील घरातून सकाळी 7.45 च्या सुमारास अर्णब गोस्वामीला अटक झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सत्ताधार्यांवर टीका केली. भाजपाकडून अर्णव यांची अटक म्हणजे 'पुन्हा आणीबाणी सारखी परिस्थिती' असं म्हटलं आहे.
दरम्यान आज दुपारी अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आधी एन एम जोशी पोलिस स्टेशन आणि नंतर अलिबाग मध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्यांची नियमानुसार मेडिकल टेस्ट आणि अन्य चाचणी झाली आहे.