गृहमंत्र्यांच्या रुपाने महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ; अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन; पहा फोटो

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन (Rakshabandhan) सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या रुपाने मिळाला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले. यावेळी अनिल देशमुख यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

Anil Deshmukh celebrates Rakshabandhan with women police personnel (PC - Twitter)

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन (Rakshabandhan) सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या रुपाने मिळाला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले. यावेळी अनिल देशमुख यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

दरम्यान, यावेळी फुटपाथवरील बेघर महिलेला प्रसुती करण्यास मदत करत तिला व तिच्या बाळाला सुखरूप दवाखान्यात भरती करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि महिला पोलीस शिपाई अस्मिता जाधव उपस्थित होत्या. तसेच पनवेल नजिकच्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांचा 10 वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणाऱ्या महिला पोलीस नाईक रेहाना शेख यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या महिला पोलीस नाईक रंजनी जबारे, तसेच एकाच दिवशी 4 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महिला पोलीस नाईक संध्या शिलवंत उपस्थित होत्या. (हेही वाचा - भविष्यात साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, या सर्व महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माझ्या पुढील कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली. पोलीस दलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने मला सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement