Anil Deshmukh 100 Crore Extortion Case: मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप; PA मार्फत पैसे घेतल्याचे पुरावे CBI ला दिल्याची माहिती

जयंत पाटीलांवर काय आरोप केले आहेत याची माहिती समोर आलेली नाही पण सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर पीए मार्फत पैसे घेतल्याचं सांगण्यात आले आहे.

Anil Deshmukh and Sachin Waz | (Photo Credit - PTI)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामधील मागील काही दिवसात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये आता मुंबईचे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze)  याने  100 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये एक मोठा दावा केला आहे. त्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत, जयंत पाटील (Jayant Patil)  यांचेही नाव घेतले आहे. यामध्ये वाझेने अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप केला आहे. त्याचे पुरावे सीबीआय कडे दिल्याचे ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

सचिन वाझे चा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत सचिन वाझे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये जयंत पाटील यांच्या नावाचाही उल्लेख आहे. दरम्यान अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घेत असल्याचे ते म्हणाले आहेत. याचे पुरावे सीबीआय कडे देण्यात आले आहेत. तसेच गृहमंत्री फडणवीसांना देखील दिलेल्या पत्रात त्याचे पुरावे आहे. माझी नार्को टेस्ट करा त्यासाठी मी तयार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान जयंत पाटीलांवर काय आरोप केले आहेत याची माहिती समोर आलेली नाही पण सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर पीए मार्फत पैसे घेतल्याचं सांगण्यात आले आहे. Aaditya Thackeray-Uddhav Thackeray यांना खोट्या प्रकरणांत अडकवा, तपास यंत्रणांसमोर जबाब देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांवर दबाव असल्याचा श्याम मानव यांच्याकडून खळबळजनक दावा. 

अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून चौकशीची भाजपाची मागणी

100 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणामध्ये सध्या जामीनावर बाहेर असलेल्या अनिल देशमुखांची त्यांचा जामीन रद्द करून पुन्हा चौकशी करावी अशी मागणी भाजपाच्या प्रसाद लाड यांनी केली आहे.

दरम्यान मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमधून स्फोटके जप्त केल्याच्या तपासात NIA ने मार्च 2021 मध्ये सचिन वाझे याला अटक केली होती. 25 फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवल्याचा वाझे हा मुख्य आरोपी आहे.