Anil Deshmukh: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली केल्याच्या रागातून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले- अनिल देशमुख
अँटिलियाबाहेर गेल्या महिन्यात स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.
अँटिलियाबाहेर गेल्या महिन्यात स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. याचदरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्यात पेटलेल्या राजकारणामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण अद्याप थांबलेले नसून पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्यावर तोफ डागली आहे.
अनिल देशमुख यांनी नुकताच नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “घाडगे, डांगे, सोनु जालन, केतन अशा अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी परमबीर सिंग यांच्याबद्दल येत आहेत. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन सापडणे किंवा मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही घटनांच्या बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. यामुळे मी त्यांची ताबडतोब बदली केली. पण त्या रागातूनच त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Nashik: त्र्यंबकेश्वर इथे येत्या शुक्रवारी होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या वारीची यात्रा या वर्षीही रद्द
मनसुख हिरेन प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांना गेल्या महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेन अटक केली होती. सुनील माने यांना काल विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.